।। श्री ।।

तारीख: ०१ / १० / २०१७

स. न. वि. वि.
कळविण्यास आनंद होत आहे की श्री. योगेश्वरीच्या कृपेने व पुण्यातील दोन उद्योजक कै. दाजीसाहेब गाडगीळ, मे. पु. ना गाडगीळ सराफ व कै. भाऊसाहेब चितळे, मे. चितळे बंधू मिठाईवाले यांचे मार्गदर्शनाखाली अंबेजोगाई येथील भक्त निवासाचे काम पूर्ण झाले आहे.

शनिवार दिनांक २ मे २०१४, अक्षय तृतीया, या दिवसापासून भक्त निवासातील सर्व २१ खोल्या भक्तांसाठी उपलब्ध आहेत.

भक्त निवासाचे काम पूर्ण करण्यास हजारो देणगीदारांचे सहकार्य लाभले आहे. विश्वस्त मंडळ त्यांचे शतश: आभारी आहे.भक्त निवासातील सर्व खोल्या टॉयलेट अटॅच आहेत, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टिम आहे, चारी बाजूस कंपाउंड व प्रशस्त पार्किंग आहे. कंपाउंड मध्ये सुंदर बाग केलेली आहे.  चोविस तास आगाऊ कळविल्यास भक्त निवासातच उत्कृष्ट चहा-नाष्टा भोजनाची सोय केली जाते. आधुनिक सुविधांसह भक्त निवासाची वास्तु श्री योगेश्वरी मंदिरापासून पायी दोन मिनिटांचे अंतरावर, पार्किंग अधिक तीन मजले अशी मुकुंदराज समाधी रस्त्यावर डावीकडे पहिलीच आहे. पाच खोल्या ए.सी. सहीत आहेत व उरलेल्या खोल्या कूलर सहीत आहेत. ऑफिस फर्निचर, इमर्जन्सी लाईट, लिफ्ट, जनरेटर अशीही कामे करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यास अजून अंदाजे रु. २० लाख लागतील. आपणास विनंती आहे की आपण भरघोस देणगी दिल्यास नियोजीत कामे लवकर पूर्ण करता येतील.

श्री अंबेजोगाई भक्त निवास न्यास, पुणे या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड, पुणे येथे ट्रस्टचे अकौंट उघडले आहे.
सेव्हिंग्ज अकौंट नं. 60008936410, IFSC Code MAHB0000001 / Swift Code No MAH BIN BBOCP आहे.

कोअर बँकिंगमुळे संपूर्ण भारतातून कोणत्याही बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत रोख अगर चेकने देगणी रक्कम भरावी. ट्रस्टचे नाव व अकौंट नंबर बिनचूक बँकेच्या स्लिपवर लिहावा. देणगी बँकेत जमा केल्यावर बँकेने शिक्का मारलेली काउंटर स्लिप पुणे येथे संपर्क पत्यावर पाठवून द्यावी. त्याबरोबर आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड नंबर, पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, इमेल आयडी, सेलफोन नंबर, लँडलाइन नंबर
कळवावा. म्हणजे देणगीची पावती त्वरीत पाठविली जाईल किंवा आपल्या अमुल्य देणगीचा चेक, संपर्क पत्यावर पाठवून द्यावा.

संपर्क पत्ता पुढीलप्रमाणे:-

  • संजय वा.जोशी – c/o गोविंद दाजी जोशी (लकडे सुगंधी) १४८७, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, जनता बँक शेजारी, पुणे ४११००२
  • रु. पाच लाखाची देणगी दिल्यास एका खोलीस देणगीदारांच्या सूचने प्रमाणे नाव दिले जाईल.
  • कमीत कमी देणगी रू. ५००० /- असावी. देणगी इमारत निधी म्हणूनच जमा होईल. आज पर्यंत रू. १ कोटी ७५ लाखाचे काम झाले आहे.
  • संस्थेस इन्कमटॅक्सची ८० जीची सवलत कायम स्वरूपी मिळाली आहे. No. Pn/CIT-I/80G/34/11-12 Permanet
  • भक्त निवासाचे फोटो वेबसाइटवर बघावयास मिळतील. www.ambejogaidevi.com

   

विश्वस्त : श्रीपाद वि.करमरकर (९९७०७६६३९१)

विश्वस्त : संजय जोशी (९४२२५५८८४४)

विश्वस्त : श्रीधर मोडक (९४२३००३४७९)

संस्थेचे चार्टड अकौंटट: मे. जी.वाय.लिमये (९८२२३२९७८४)

प्रिंटर्स: मे. प्रकाश ऑफसेट, प्रकाश वेलणकर (९८२३०५११००), prakash.offset@rediffmail.com, prakash.offset93@gmail.com

(रोख देगणी/चेक ट्रस्टच्या खात्यावरच म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र सेव्हिंग्ज अकौंट नं. ६०००८९३६४१० वरच भरावी)