www.gokhaleconstructions.com

www.dskdl.com

www.encodexindia.com

www.hotelpresedentpune.com

 

www.aask-dam.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

श्री योगेश्वरी देवीची माहिती, अंबेजोगाई

श्री योगेश्वरी देवी चित्पावनांची कुलदेवता मराठवाड्यात अंबेजोगाई येथे कशी आली? याविषयी ऐतिहासिक कथा आहे.

श्री योगेश्वरी देवी, ही देवी मूळ कोकणचीच, गुहागर येथे दुर्गा देवीचे देवालय आहे. परळी वैजनाथ येथील शंकरा बरोबर देवीचे लग्न ठरले. सर्व व्हराडी निघाले. परुंतु वाटेत अंबेजोगाई येथे ‘नवरा पसंत नाही’ म्हणून नवरी रुसून बसली. लग्न मुहूर्त टळून गेला. तेव्हापासून देवी अविवाहित राहिली.

दुसऱ्या कुठे मध्ये लग्नाचा गोरज मुहूर्त असल्याने व अंबेजोगाईला पोहोचे पर्यंत गोरज मुहूर्त टळून गेल्याने विवाह संप्पन झाला नाही म्हणून देवी कुमारिका राहिली अशीही एक कथा आहे.

याची साक्ष म्हणून दगडाच्या वर्‍हाडींची गुहा मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. दंतासूर नावाच्या असुराला ठार केले म्हणून दंतासुर्मर्दिनी असेही नाव पडले.  दंतासूरचा वध करून आंब्याच्या झाडाखाली पहुडली म्हणून ‘अंबेजोगाई’ असे नाव पडले अशीही एक कथा आहे.

परंतु कोकणातील चित्पावनांची ही कुलदेवता कशी बनली अशीही शंका निघते. याविषयी पौराणिक कथा आहे. ‘अपरान्त’ किंवा परशुरामाची भूमी म्हणूनही हा प्रांत ओळखला जातो. कोकणप्रांताची निर्मिती केल्यानंतर त्या प्रांतात शेती करण्यासाठी परशुरामांनी १४ गोत्रांमधून ६० कुटुंबे कोकणात नेली. तसेच कोकणच्या समुद्रकिनारी अर्धमृत अवस्थेत येऊन लागलेल्या १४ व्यक्तींना संजीवनी देऊन जिवंत केल्यानंतर त्यांच्याबरोबर विवाह लावून देण्यासाठी परशुरामांनी अंबेजोगाई येथूनच वधू कोकणात नेल्या.

आपल्या मुलींची कोकणात पाठवणी करताना अंबेजोगाईच्या लोकांनी एक अट घातली की, कोकणात ज्या व्यक्तींबरोबर अंबेजोगाईहून नेलेल्या वधूंचा विवाह होईल त्या प्रत्येक कुलांनी योगेश्वरी देवीला कुलदैवत मानावे.

आपल्या कडील मुली विवाह करून कोकणात नेल्यानंतर हे गरीब आपल्या मुलींना मराठवाड्यात पाठवतील का? अशी शंका तेथील मुलीकडील मंडळींनी व्यक्त केल्यावर परशुराम यांनी तुमची ग्रामदेवता आम्ही कुलदेवता म्हणून स्वीकारतो असे सांगीतले, त्यमुळेच आज मूळ ६० घराण्यांपैकी ३७ घराण्यांची प्रमुख कुलदेवता अंबेजोगाई आहे. अन्य १० घराण्यांमध्ये अन्य देवतेंबरोबर योगेश्वरी ही देवता कुल देवता म्हणून मान्य केली आहे.