निवेदन :
 

  महाराष्ट्रातील अनेक कुटुंबियांची मराठवाडा भागातील श्रीयोगेश्वरी देवी, आंबेजोगाई कुलस्वामिनी आहे. रोज संपूर्ण महाराष्ट्रातून पंधरा ते वीस कुटुंबे देवीच्या दर्शनाला – देवीची ओटी भरण्यासाठी किंवा कुटुंबातील कुलाचार पूर्ण करण्यासाठी जात असतात. परंतु तेथे गेल्यावर कुटुंबासाठी आधुनिक उत्तम निवास व भोजनाची सोय नाही. शिवाय अलीकडे अंबेजोगाईला भेट देणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे ज्या सोयी सुविधा आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत. तसेच नवीन पिढीला कोणाच्या घरी राहणे शक्यतो नको वाटते हे लक्षात घेऊन ही असलेली गैरसोय कमी होण्याचे दृष्टीने विश्रामधाम / यात्री निवास उभे करावयाचे ठरविले आहे. त्या दृष्टिकोनातून पुण्यातील दोन जेष्ठ उद्योजक मे. पु. ना. गाडगीळ (सराफ) फार्मचे श्री.दाजीसाहेब गाडगीळ व मे. चितळे बंधु मिठाईवाले श्री. रघुनाथराव (भाऊसाहेब) चितळे यांचे पुढाकाराने व मार्गदर्शनाने ‘श्री. अंबेजोगाई भक्त निवास न्यास, पुणे’ नावाने सार्वजनिक न्यासाचे स्थापना केली आहे. त्यास नोंदणी प्रमाणपत्रही व आयकर सवलत ८० जी प्रमाणपत्र मिळाले आहे.

२४ फेब्रुवारी २००६ रोजी मा. मनोहर जोशी सर व सौ. अनाघाताई जोशी यांचे हस्ते भूमीपूजन झाले व ऑडिटर आणि सल्लागार यांचे हस्ते १८/२/२०१४ ला वास्तुशांत झाली आहे. प्रत्यक्ष राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था २ मे २०१४ पासून झाली.

अंबेजोगाई नगर परिषदेने दिलेला नकाशा मंजुरी क्रमांक १२१ ता. ८-८-२००८, फाईल नं. ४५ / १७ / ०८. इमारत बांधकाम पूर्ण दि _______ ला पालिकेने दिला आहे.
 
       

Designed by: Parag Gore