www.gokhaleconstructions.com

www.dskdl.com

www.encodexindia.com

www.hotelpresedentpune.com

 

www.aask-dam.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

निवेदन :

महाराष्ट्रातील अनेक कुटुंबियांची मराठवाडा भागातील श्रीयोगेश्वरी देवी, आंबेजोगाई कुलस्वामिनी आहे. रोज संपूर्ण महाराष्ट्रातून पंधरा ते वीस कुटुंबे देवीच्या दर्शनाला – देवीची ओटी भरण्यासाठी किंवा कुटुंबातील कुलाचार पूर्ण करण्यासाठी जात असतात. परंतु तेथे गेल्यावर कुटुंबासाठी आधुनिक उत्तम निवास व भोजनाची सोय नाही. शिवाय अलीकडे अंबेजोगाईला भेट देणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे ज्या सोयी सुविधा आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत. तसेच नवीन पिढीला कोणाच्या घरी राहणे शक्यतो नको वाटते हे लक्षात घेऊन ही असलेली गैरसोय कमी होण्याचे दृष्टीने विश्रामधाम / यात्री निवास उभे करावयाचे ठरविले आहे. त्या दृष्टिकोनातून पुण्यातील दोन जेष्ठ उद्योजक मे. पु. ना. गाडगीळ (सराफ) फार्मचे श्री.दाजीसाहेब गाडगीळ व मे. चितळे बंधु मिठाईवाले श्री. रघुनाथराव (भाऊसाहेब) चितळे यांचे पुढाकाराने व मार्गदर्शनाने ‘श्री. अंबेजोगाई भक्त निवास न्यास, पुणे’ नावाने सार्वजनिक न्यासाचे स्थापना केली आहे. त्यास नोंदणी प्रमाणपत्रही व आयकर सवलत ८० जी प्रमाणपत्र मिळाले आहे.

आपल्या भक्त निवासाची वास्तु श्री. योगेश्वरी मंदिराच्या पश्चिमेस देवीचे मंदिरापासून २ मिनिटाचे अंतरावर मुकुंदराज समाधी रस्त्यास लागून चित्पावन ब्राह्मण संघ, मुंबई (गिरगांव) यांच्या १०००० चौरस फूट जागेवर बांधली आहे. प्रकल्प दोघांच्या सयुंक्त विद्यमाने उभा राहिला आहे. त्याप्रमाणे दोन्ही ट्रस्टच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.

ट्रस्टचे रजिस्ट्रेशन १९९९ साली झाले असले तरी प्रत्यक्ष काम २००१ मधे चालू चालू करावयाचे वेळेस अंबेजोगाई नगरपरिषदेने मुकुंदराज रस्त्यावरील प्लॉटवर पिकनिक स्पॉट म्हणून सरकारी रिझर्व्हेशन आहे म्हणून ट्रस्टला कळविले. रिझर्व्हेशनकाढून निवासी क्षेत्र म्हणून बदल करून घेण्याची सरकार दरबारी खूप मोठी प्रोसेस होती, प्रत्येक कागद अंबेजोगाई नगरपरिषद – बीड – औरंगाबाद – पुणे (नगर रचनाकार ऑफिस) मंत्रालय व मुख्यमंत्री व तशीच परत या कामात पाच वर्षे गेली. ट्रस्ट असल्यामुळे बेकायदेशीर काहीही करावयाचे नाही असे सर्व विश्वस्तांनी मिळून ठरविले होते. त्यामुळे निधी संकलनाचे कामही थांबविले. डिसेंबर २००५ मध्ये निवासी क्षेत्र म्हणून परवानगी मिळाली. या सर्व प्रवासात मा. मनोहर जोशी सर (माजी लोकसभा सभापती) यांचे खूपच मार्गदर्शन झाले.

२४ फेब्रुवारी २००६ रोजी मा. मनोहर जोशी सर व सौ. अनाघाताई जोशी यांचे हस्ते भूमीपूजन झाले. २००७ मधे डिमार्केशन, टेंडर नोटीस, कॉन्ट्रॅक्टर नेमणे, नकाशा मंजुरी या प्रकरणात एक वर्ष गेले, ते काम चालू असताना एका कुटुंबाने आपल्या प्लॉटच्या पैकी ३००० स्क्वे. फूट जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केले. सरकारी झालेले डिमार्केशन त्या कुटुंबाने काढून टाकले. त्या कुटुंबाला पटवता पटवता ३० जून २००८ साल उजाडले. चर्चा करून तो प्रश्न मिटवला व ३० जून २००८ रोजी संपूर्ण प्लॉटचा १००’ X १००’ दहा हजार फूटाचा ताबा मिळून आता बांधकाम पूर्ण झाले आहे.

ऑडिटर आणि सल्लागार यांचे हस्ते १८/२/२०१३ ला वास्तुशांत झाली आहे. प्रत्यक्ष राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था २ मे २०१४ पासून झाली.

अंबेजोगाई नगर परिषदेने दिलेला नकाशा मंजुरी क्रमांक १२१ ता. ८-८-२००८, फाईल नं. ४५ / १७ / ०८. इमारत बांधकाम पूर्ण दि _______ ला पालिकेने दिला आहे.

कुलदैवत अंबेजोगाई (फक्त)

 

आचवल
आपटे
कर्वे
किडमिडे
कुंटे
गणपुले
गांगल
गांधारे
गाङगीळ
गोगटे
जाईल
दर्वे
दामले
धारू
नेने
पेंडसे
पोंक्षे
बागूल
बाम
बेहेरे
बोडस
भाडभोके
भाभे
भावे
माटे
मालशे
रानडे
लवाटे
लिमये
लोंढे
वाड
विंझे
वैशंपायन
साठये
साठे
सोमण
हेणे

 

कुलदैवत अंबेजोगाई व इतर

 

आठवले
गानू
गोवंडे
जोग
जोशी
दाबके
बापट
भडभोळे
मेहेंदळे
लेले