अंबेजोगाई येथील भक्त निवासाच्या प्रकल्पाची माहिती :
 

प्रकल्प श्री. आंबेजोगाई भक्त निवास न्यास, पुणे व चित्पावन ब्राह्मण संघ, मुंबई, गिरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने उभा राहिला आहे.

देवीच्या देवळालगत २ मिनिटाचे अंतरावर, मुकुंदराज रस्त्यावर १००’ X १००’ चा प्लॉट असून त्यावर दहा हजार चौरस फुटाचे भक्तनिवास आपण बांधले आहे. प्रत्येक मजला ३३१० चौ. फुटांचा आहे. पार्किंग सोडून तीन माजले बांधकाम झाले आहे. भरपूर हवा उजेड आहे. आच्छादित पार्किंगमध्ये एकावेळेस चार चाकी ८ वाहने बसू शकतील. ५ फूट रुंदीचा जिना, तीन मजले मिळून एका वेळेस ७५ ते ८० भक्तांची निवासाची सोय होऊ शकते. सर्व वयाच्या लोकांचा व आर्थिक स्तरावरही विचार करून भक्तनिवास बांधले आहे. १५’ X १२’ च्या १८ अॅटॅच्ड बाथरूम खोल्या आहेत. ६ कॉटच्या तीन डॉर्मेटरीज आहेत. २४’ X १३’ चा डायनिंग हॉल आहे, त्याला लागून १५’ X १२’ फुटाचे सुसज्ज किचन आहे. सुसज्ज ऑफिस आहे. २८ बाय २४ फुटाचा मध्यभागी फरसबंद चौक आहे. पाच खोल्यांना वातानुकूलित स्वयंत्र बसविला आहे. चारही बाजूला कंपाउंड वॉल व बाग आहे. आपल्या भक्त निवासासमोरचा नगरपालिकेने केलेला ८० फुटी रस्ता आहे. समोरच नगरपालिकेने केलेली उत्तम बाग आहे.

सध्याचे बांधकाम दर व इतर सोयी-सुविधांचे दर बघता संपूर्ण प्रकल्प खर्च तीन कोटींचे घरात जाईल. त्याशिवाय पुढील मेंटेनन्सचे दृष्टीनेही एक कोटी रुपये बँकेत डिपॉझिट म्हणून ठेवावयास लागतील.
  ०१. एखाद्या देणगीदाराने वैयक्तिक एक लाख देणगी दिल्यास मुख्य फलकावर नाव लिहिले जाईल.  
  ०२. एखाद्या संस्थेने किंवा वैयक्तिक व्यक्तीने दोन लाखांच्या देणग्या गोळा केल्यास त्याचे नाव मुख्य फलकावर नाव लिहिले जाईल.  
  ०३. एखाद्या देणगीदाराने किंवा एखाद्या संस्थेने एकरकमी ५ लाख रुपये दिल्यास एका खोलीवर त्यांच्या सूचनेप्रमाणे नाव लिहिले जाईल.  
  इमारत निधी म्हणूनच देणगीचा स्विकार केला जाईल. लवकरात लवकर आपले अमूल्य देणगी ट्रस्टचे खात्यावर जमा करावी म्हणजे भक्त निवासाचे काम पूर्ण होण्यास दिरंगाई होणार नाही.  
       

Designed by: Parag Gore